Posts

Showing posts from May, 2021

कोरोन ने केला 2 कोटि चा टप्पा पार।.....

Image
  नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 2 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,48,421 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,33,40,938 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,54,197 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 37,04,099 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,93,82,642 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाची दुसरी लाट ही जास्त खतरनाक असून त्यांचा सर्वाधिक धोका हा तरुणांना असल्याचं आता समोर आलं आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्याचं दिसत असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) याचं कारण सांगितलं आहे. तरुणांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात केली असावी आणि त्यामुळेच लागण होण्याचं प्रमाण वाढलं असावं असं आयसीएमआरने म्हटलं आहे. तरुणांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता आयसीएमआरचे...

कोरोनाचं संकट डोक्यावर असतानाच आता नव्या एका आजाराने तोंड वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Image
  अमरावती   | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजला असतानाच आता नव्या एका आजाराने डोकं वर काढलं आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचे काही रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्या मुळे आता महाराष्ट्राच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये एकाच दिवसात तब्बल 2 जणांचा या दुर्मिळ आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर आता अमरावती जिल्ह्यात या आजाराने शिरकाव केला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये या आजाराने सुरूवातीला प्रवेश केला. डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयामध्ये 6 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान,अमरावती जिल्ह्यात या गंभीर आजाराचे 10 रुग्ण आढळले असून त्यांच्यावर रूग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या आजारावर इलाज मोफत करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या रुग्णांना हा बुरशीजन्य आजार होत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी बोलून दाखवलं आहे. डोंबिवलीमध्ये काल 69 वर्षीय बाजीराव काटकर तसेच 38 वर्षीय तुकाराम भोईर यांचा म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराने मृत्यू झाल्याची माहिती ...